नवी दिल्ली - नुकताच भाजपमध्ये सामील झालेला आणि गुरुदासपूरमधून लोकसभेचा उमेदवार असलेला अभिनेता सनी देओल याच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले आहे. यावर सनी देओलकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल एक अभिनेता असून तो फिल्मी फौजी आहे. तर मी असली फौजी असून आम्ही त्यांना पराभूत करणार आहोत. त्यामुळे गुरुदारपुरचे काँग्रेसचे उमेदवारी किंवा काँग्रेससाठी सनी देओल यांची उमेदवारी विशेष धोकादायक नसल्याचे म्हटले. अमरिंदर सिंह यांच्या टीकेवर सनी देओलचे काय प्रत्युत्तर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपकडून २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा पंजाबमधील तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये तीन उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून सनी देओलला गुरुदासापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर किरण खैर यांना पुन्हा एकदा चंदीगढमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. तर सोम प्रकाश यांना होशियारपूरमधून तिकीट देण्यात आले. गुरुदासपूरमध्ये सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. जाखड विद्यमान खासदार आहे.