शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संसदेत २८० नवे खासदार; सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:08 IST

Lok Sabha Election 2024 : २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून, तेव्हा २६७ सदस्य पहिल्यांदाच खासदार झाले होते.

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेत माजी मुख्यमंत्री, चित्रपटतारे, राजकीय कार्यकर्ता आणि उच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले सुमारे २८० खासदार पोहोचले आहेत. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून, तेव्हा २६७ सदस्य पहिल्यांदाच खासदार झाले होते.

एकूण २६३ नवनिर्वाचित खासदारांनी यापूर्वी लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त १६ खासदार राज्यसभेचे सदस्य आहेत आणि एका खासदाराने लोकसभेत पोहोचण्याची कामगिरी सातव्या वेळा केली, अशी माहिती विचारगट पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने दिली आहे.

फेरनिवड झालेल्या खासदारांपैकी आठजणांनी आपला मतदारसंघ बदलला आणि एकजण दोन मतदारसंघातून निवडून आला. १७व्या लोकसभेत पुन्हा निवडून आलेल्या नऊ खासदारांनी वेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले, तर इतर आठ खासदारांनी त्यांच्या पूर्वीच्या पक्षापासून फुटलेल्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले. निवडणूक लढविलेल्या ५३ मंत्र्यांपैकी ३५ विजयी झाले आहेत.

अरुण गोविल, चंद्रशेखर आझाद लोकसभेतउत्तर प्रदेशमधून ४५ सदस्य पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आहेत. दूरदर्शन मालिका ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (मेरठ), अमेठी मतदारसंघातून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करणारे काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा, नगिना मतदारसंघातून दलित हक्क कार्यकर्ते आणि आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे.

राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराजराजघराण्यातील सदस्यांमध्ये छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर), यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार (म्हैसूर) आणि कृती देवी देबबरमन (त्रिपुरा पूर्व) यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील तमलुक लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हेही पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.

मनोरंजन विश्वातून कंगना रणाैत, सुरेश गोपीअभिनयाशी संबंधित आणि लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून सुरेश गोपी आणि मंडीतून निवडून आलेल्या कंगना रणाैत यांचा समावेश आहे. राज्यसभा सदस्य अनिल देसाई (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांनीही पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला आहे.

नारायण राणेंसह अनेक माजी मुख्यमंत्री : पहिल्यांदा लोकसभेत पोहोचलेल्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), त्रिवेंद्रसिंग रावत (हरिद्वार, उत्तराखंड), मनोहर लाल (कर्नाल, हरयाणा), बिप्लब कुमार देब (त्रिपुरा पश्चिम, त्रिपुरा), जीतन राम मांझी (गया, बिहार), बसवराज बोम्मई (हावेरी, कर्नाटक), जगदीश शेट्टर (बेळगाव, कर्नाटक), चरणजित सिंग चन्नी (जालंधर, पंजाब) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून ३३ नवे सदस्य : महाराष्ट्रातून पहिल्यांदाच लोकसभेत ३३ सदस्य पोहोचले आहेत. त्यात शिक्षक भास्कर भगरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुंबई उत्तरमधून भाजपचे पीयूष गोयल, अमरावतीमधून काँग्रेसचे नेते बळवंत वानखेडे, अकोल्याहून माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे आणि सांगलीतून अपक्ष सदस्य विशाल पाटील यांचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल