दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:36 PM2024-02-14T22:36:43+5:302024-02-14T22:37:23+5:30

आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 7 ही जागांवर तयारी करण्यास सांगितले आहे. 

lok sabha election 2024 AAP-Congress alliance broke in Delhi | दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

दिल्लीमध्येआम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी तुटली आहे. आम आदमी पार्टीने आसाम आणि गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस हायकमान नाराज होते. यानंतर आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 7 ही जागांवर तयारी करण्यास सांगितले आहे. 

काँग्रेस दिल्लीतील सर्व जागांवर लढणार - 
आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेसला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आपचा हा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला होता. "आपण दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी सहा जागा लढवू इच्छित आहोत आणि आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देण्यास तयार आहोत," असे आम आदमी पक्षाने मंगळवारी (13 फेब्रुवारी) म्हटले होते. यानंतर, आता काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीने दिल्लीतील सातही जागांसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले आहे.

बंगाल, बिहार, पंजाबमध्येही काँग्रेसला धक्का -
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी I.N.D.I.A. मधून बाहेर पडत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूनेही I.N.D.I.A. ला राम राम ठोकला आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपण पंजाबात एकट्याने निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपनं आसाम आणि गुजरातमध्ये केली उमेदवारांची घोषणा -
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी गुरुवारी आममधील तीन लोकसभा मतदार संघात उमेदवारांच्या नावाची गोषणा केली आहे. याच बरोबर, काँग्रेससोबत अनेकवेळा जागा वाटपासंदर्भा चर्चा जाली मात्र कुठलाही मार्ग निघाला नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आम आदमी पार्टीने दिब्रूगडमध्ये मनोज धनोहर, गुवाहाटीमधून भाभेन चौधरी आणि सोनितपूरमधून ऋषी राज उमेदवारी दिली आहे.

याशिवाय, आम आदमी पार्टीने गुजरातमधील भरूचमध्ये चैत्र वसावा आणि भावनगरमधून उमेश भाई मकवाना यांच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीकडून गुजरातमध्ये 26 पैकी 8 जागांची मागणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, संदीप पाठक यांनी म्हटले आहे की, आपला पक्ष काही दिवस काँग्रेसच्या उत्तराची प्रतीक्षा करेल, यानंतर सहाही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा करेल.
 

Web Title: lok sabha election 2024 AAP-Congress alliance broke in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.