शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिल्लीमध्ये आप-काँग्रेसची आघाडी तुटली! अरविंद केजरीवालांवर हाय कमान नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:36 PM

आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 7 ही जागांवर तयारी करण्यास सांगितले आहे. 

दिल्लीमध्येआम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी तुटली आहे. आम आदमी पार्टीने आसाम आणि गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस हायकमान नाराज होते. यानंतर आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 7 ही जागांवर तयारी करण्यास सांगितले आहे. 

काँग्रेस दिल्लीतील सर्व जागांवर लढणार - आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेसला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आपचा हा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला होता. "आपण दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी सहा जागा लढवू इच्छित आहोत आणि आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देण्यास तयार आहोत," असे आम आदमी पक्षाने मंगळवारी (13 फेब्रुवारी) म्हटले होते. यानंतर, आता काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीने दिल्लीतील सातही जागांसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले आहे.

बंगाल, बिहार, पंजाबमध्येही काँग्रेसला धक्का -पश्चिम बंगालमध्ये टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी I.N.D.I.A. मधून बाहेर पडत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूनेही I.N.D.I.A. ला राम राम ठोकला आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपण पंजाबात एकट्याने निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपनं आसाम आणि गुजरातमध्ये केली उमेदवारांची घोषणा -आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी गुरुवारी आममधील तीन लोकसभा मतदार संघात उमेदवारांच्या नावाची गोषणा केली आहे. याच बरोबर, काँग्रेससोबत अनेकवेळा जागा वाटपासंदर्भा चर्चा जाली मात्र कुठलाही मार्ग निघाला नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आम आदमी पार्टीने दिब्रूगडमध्ये मनोज धनोहर, गुवाहाटीमधून भाभेन चौधरी आणि सोनितपूरमधून ऋषी राज उमेदवारी दिली आहे.

याशिवाय, आम आदमी पार्टीने गुजरातमधील भरूचमध्ये चैत्र वसावा आणि भावनगरमधून उमेश भाई मकवाना यांच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीकडून गुजरातमध्ये 26 पैकी 8 जागांची मागणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, संदीप पाठक यांनी म्हटले आहे की, आपला पक्ष काही दिवस काँग्रेसच्या उत्तराची प्रतीक्षा करेल, यानंतर सहाही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा करेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी