शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

पंजाबमध्ये आप-काँग्रेस येणार एकत्र? जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता, आपने रोखले ६ उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 8:04 AM

AAP-Congress Alliance: पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी आप आणि काँग्रेस पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - आप आणि काँग्रेस पक्षाने दोन महिन्यांपूर्वी पंजाब लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे मान्य केले होते. तथापि, दिल्ली, हरयाणा आणि गुजरातमध्ये त्यांची आघाडी आहे. पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी हे दोन्ही पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलेले आहे. काँग्रेसने आता आप नेत्यांना पंजाबमध्ये एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आघाडी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपण एकत्र लढूनच काहीतरी साध्य करू. जर आपण एकमेकांना रोखत राहिलो तर आपण पुढे जाणार नाही. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची जी सभा झाली त्याच्या यशस्वीतेमागे भगवंत मान यांनी महत्त्वाची भूमिका आहे. भाजपने  पंजाबमधील सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यातील बहुतांश काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. त्यानंतर खरगे यांनी आघाडीबाबत भाष्य केले आहे.

‘आप’ने केली हाेती स्वबळाची घाेषणा- ‘आप’ने पंजाबमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तर, ७ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र, ६ जागांवर उमेदवार जाहीर केले नव्हते. - काँग्रेसने आतापर्यंत १३ पैकी एकाही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. कारण पंजाबमध्ये सातव्या टप्प्यात १ जूनला मतदान आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024congressकाँग्रेसAAPआप