जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 07:11 PM2024-01-07T19:11:26+5:302024-01-07T19:13:00+5:30

अद्याप India आघाडीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही.

Lok Sabha Election 2024: After JDU, now AAP has given a blow to the INDIA alliance, directly announced its candidate for Lok Sabha | जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष (AAP) अॅक्टिव्ह झाला आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरुच मतदारसंघातून आपला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा यांना आपने भरुच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, अद्याप INDIA आघाडीतील जागांचे वाटप झालेले नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत. बर इंडिया आघाडीतील पक्षाने उमेदवार जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जनता दल युनायटेड (JDU) ने अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुची तांगुक, यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे.

तुरुंगात आहेत चैत्रा वसावा 
गुजरातमधील नेत्रंग येथे एका सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज मी जाहीर करतोय की, चैत्र वसावा आम आदमी पार्टीच्या वतीने भरुच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसावा यांना जामीन मिळाला नाही, तर ते तुरुंगातीन लोकसभेची निवडणूक लढवतील." गुजरातमधील डेडियापाडा येथील आप आमदार चैत्रा वसावा वन विभागाशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात आहेत.

'भाजप दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहे'
यावेळी भाजपवर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपच्या सांगण्यावरुन अटक केली. ते मला धाकट्या भावासारखे आहेत. सर्वात दुःखाची बाब म्हणजे वसावा यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. डाकूंचाही धर्म होता, पण भाजपवाले त्या डाकूंपेक्षाही वाईट आहेत. चैत्र वसावा वाघ आहेत, त्यांना फार काळ पिंजऱ्यात ठेवता येत नाही," असं केजरीवाल म्हणाले. 

कोण आहेत चैत्रा वसावा?
चैत्राभाई दामजीभाई वसावा डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. जानेवारी 2023 मध्ये त्यांची गुजरात विधानसभेत AAP चे विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे कथित खंडणी आणि वन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वसावा तुरुंगात आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2024: After JDU, now AAP has given a blow to the INDIA alliance, directly announced its candidate for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.