डॉ. वसंत भोसले
बेळगाव : कर्नाटकातील भाैगाेलिकदृष्ट्या सर्वात माेठा लाेकसभा मतदारसंघ असणाऱ्या कारवारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने या मतदारसंघात सहावेळा विजय नाेंदविला. मात्र भारतीय संविधान बदलण्यासाठी भाजपने ‘चारसाे पार‘चा नारा दिला आहे, असे वक्तव्य करणारे अनंतकुमार हेगडे यांनाच बदलून टाकण्यात आले.
मागील निवडणुकीत ६८ टक्के मतदान घेणारे अनंतकुमार हेगडे यांना उमेदवारी नाकारून भाजपने सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी दिली. काॅंग्रेसनेही याच मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक हरणाऱ्या डाॅ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदार संघ कारवार आणि बेळगाव जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात पसरला आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मतदारसंघाचे भाैगाेलिक विस्तार प्रचंड असल्याने पाेहाेचणे कठीण
पर्यटनास अनुकुलता असतानाही धार्मिक तणावाने ग्रस्त परिसर
निसर्गसंवर्धन आणि खाणकामामुळे असमताेलावर वाढ
२०१९ मध्ये काय घडले?
अनंतकुमार हेगडे
भाजप (विजयी)
७,८६,०४२
आनंद आस्नाेतीकर
काॅंग्रेस
३,०६,३९३
एकूण मतदार १६,०१,६२४
८,०७,४३५
पुरुष
७,९४,१८९
महिला