'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:34 AM2024-04-21T11:34:57+5:302024-04-21T11:38:28+5:30
देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. दरम्यान, देशभरात भाजपा किती जागांवर विजय मिळवेल यावर प्रसिद्ध अर्थतज्ञांनी भाकित केलं आहे.
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत, १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. भाजपाने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपा या निवडणुकीत किती जागा जिंकणार यावर अनेकांनी दावे केले आहेत. आता आणखी एका प्रसिद्ध अर्थतज्ञांनी दावा केला आहे. अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी भाजप स्वबळावर ३३० ते ३५० जागा जिंकू शकेल, असा दावा त्यांनी केला. तामिळनाडू सारख्या राज्यात ५ जागा जिंकू शकतात असंही त्यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका! योग शिबिरासाठी भरावा लागणार सेवाकर
अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांचे नुकतेच नवीन पुस्तक 'हाऊ वी व्होट' प्रकाशित झाले आहे, त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत भाजपला ३३० ते ३५० जागा मिळू शकतात. मी फक्त भाजपबद्दल बोलत आहे, त्यात त्यांच्या सहयोगी भागीदारांचा समावेश नाही. सुरजीत भल्ला यांच्या अंदाजानुसार, २०१९ च्या तुलनेत भाजपला जास्त जागा मिळतील. २०२४ च्या निवडणुकीत ५ ते ७ टक्के जास्त जागा मिळू शकतात, असंही भल्ला म्हणाले.
"प्रत्येक निवडणुकीत एक लाट दिसते. ही एक-लहर निवडणूक असू शकते, असंही अर्थतज्ज्ञ म्हणाले. "प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला ४४ जागा मिळू शकतात. "विरोधी आघाडीची समस्या नेतृत्वाची आहे. अर्थव्यवस्थेला सर्वाधिक महत्त्व असते हे खरे आहे, पण नेतृत्वही दुसऱ्या क्रमांकावर येते आणि या दोन्ही बाबींमध्ये भाजप मजबूत आहे. जर विरोधी पक्षांनी असा नेता निवडला जो पंतप्रधान मोदींच्या तुलनेत असेल तर जनतेचे आवाहन, मला वाटते की यावेळची निवडणूक रंजक आणि खडतर ठरली असती, असंही भल्ला म्हणाले.
तामिळनाडूत भाजपला पारंपारिकपणे कमकुवत मानले जाते. तिथे भाजप किमान पाच जागा जिंकू शकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. येथे द्रमुक आणि एआयडीएमके यांच्यातच लढत दिसत आहे. तामिळनाडूमध्ये भाजपला पाच किंवा त्याहून अधिक जागा मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. केरळमध्ये कदाचित एक किंवा दोन जागा मिळतील, असा अंदाजही भल्ला यांनी व्यक्त केला.