बंगळुरू दक्षिण मतदारसंघात भाजपचे तेजस्वी सूर्यांना मंत्र्यांच्या कन्येचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:15 AM2024-04-21T08:15:56+5:302024-04-21T08:16:53+5:30
गेल्या सात निवडणुकीत भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यापैकी सहा निवडणुका अनंतकुमार यांनी जिंकल्या होत्या
डॉ. वसंत भोसले
बंगळुरू : बंगळुरू शहरातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांना मंत्र्यांची कन्या व काँग्रेसची उमेदवार सौम्या रेड्डी यांनी आव्हान उभे केले आहे. उच्चभ्रू लोकवस्ती, उत्तम पायाभूत सुविधा, मोठा मध्यमवर्ग आणि देशाची सिलिकॉन व्हॅली इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून हा मतदारसंघ ओळखला जाताे.
गेल्या सात निवडणुकीत भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यापैकी सहा निवडणुका अनंतकुमार यांनी जिंकल्या होत्या. भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. तर, सौम्या रेड्डी या परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी यांच्या कन्या व माजी आमदार आहेत. संपूर्ण मतदारसंघ सुशिक्षित आणि तेजस्वी सूर्या तसेच सौम्या रेड्डी या उच्चशिक्षित उमेदवारांची लढत लक्षवेधी आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
शहरातील वाढती वाहतूक समस्या.
पयार्वरणाची समस्या अधिक तीव्र.
काही भागांमध्ये पाणीटंचाईची झळ.
धार्मिक ध्रुवीकरणाचा वाढता प्रभाव.
घरांच्या वाढत्या किमतीची समस्या.
२०१९ मध्ये काय घडले?
तेजस्वी सूर्या
भाजप (विजयी)
७,३९,२२९
बी. के. हरिप्रसाद
काँग्रेस (पराभूत)
४,०८,०३७