शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नितीश कुमार बुधवारी दिल्लीत पोहोचले आहेत...

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर किंगमेकरच्या भूमिकेत आलेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपसोबत तगडी सौदेबाजी करण्याच्या तयारीत आहे. जेडीयूने देशात जातनिहाय जनगणना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासोबतच, केंद्रीय मंत्रिमंडळात किमान पाच मंत्रिपदांची मागणी केल्याचे वृत्त आहे. नितीश कुमार यांची केंद्रीय मंत्रिमंडळातील रेल्वे, ग्रामीण विकास आणि जलसंपदा, अशा महत्त्वाच्या मंत्रालयांवर नजर असल्याचेही बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते बुधवारी दिल्लीत पोहोचले आहेत. जेडीयूच्या एका नेत्याच्या हवाल्याने लाइव्हहिंदुस्तान डॉट कॉमने दिलेल्या एका वृत्तानुसार, बिहारमधील विकासासाठी जेडीयू नेतृत्वाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये काही महत्वाची मंत्रालये मिळावीत अशी अपेक्षा आहे. जेनेकरून बिहारचे इंफ्रास्ट्रक्चर आणखी मजबूत करण्याच्या कामाला वेग येईल.

संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना -लाइव्हहिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या आणखी एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हटले आहे की, "बिहारमधील जातनिहाय जनगणनेचे मॉड्यूल संपूर्ण देशात लागू करण्याची मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इच्छा आहे. केंद्र सरकारकडून देशभरात जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी जेडीयू आग्रही असणार आहे. जेणेकरून गरीब आणि मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणता येईल."

बिहारला विशेष राज्याचा दर्जा -याशिवाय, जेडीयू बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठीही आग्रही असणार आहे. यासंदर्भात बोलताना जेडीयू एमएलसी खालिद अन्वर यांनी म्हटले आहे की, बिहारच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. यामुळे विशेष राज्याचा दर्जा आणि केंद्राकडून मोठा फंड मिळावा, अशी जेडीयूची इच्छा आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत, एनडीएला एकूण २९२ जागा मिळाल्या आहेत. यांपैकी भाजपला एकट्याला २४० जागा मिळाल्या आहेत. अर्थात भाजपला एकट्याला बहुमत (२७२) मिळवता आले नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत 12 जागा जिंकणारे जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBiharबिहार