Amit Shah News: लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे निवडणुकीचा प्रचारदेखील शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरक्षणाचा मुद्दा मांडला जातोय. अशातच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लिम आरक्षणावर मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. भाजप धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणार आहे." यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला.
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये जनतेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारांना वटणीवर आणण्याचे काम केले. आधी राज्यात देशी बंदुका बनवल्या जायच्या, आज ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवले जातात. इथे बनवलेले तोफगोळे एखाद्या दिवशी पाकिस्तानवरही पडू शकतात." यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले, "राहुल गांधी म्हणायचे की, कलम 370 हटवले तर रक्ताच्या नद्या वाहतील. राहुलजी, ही तुमच्या आजीचा काळ नाही. आता तिकडे एक खडाही उचलला जात नाही."
मुस्लिम आरक्षण संपवणार...यावेळी शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एससी-एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घालणे, हा इंडिया आघाडीचा उद्देश आहे. कालच बंगाल उच्च न्यायालयाने मुस्लिमांना ओबीसीतून दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळेच आम्ही धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणार आहोत."
काँग्रेस 40 जागांचा आकडाही...शाह पुढे म्हणतात, "पाच टप्प्यातील निवडणुका संपल्या आहेत. मोदीजींनी या पाच टप्प्यात 310 जागांचा टप्पा पार केला आहे. इंडिया आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. यावेळी काँग्रेसला 40 जागांचा आकडाही पार करता येणार नाही आणि अखिलेश यादव तर 4 जागाही जिंकू शकत नाही," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.