किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:57 AM2024-04-03T10:57:07+5:302024-04-03T10:57:24+5:30

Lok sabha Election 2024: आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत.

Lok sabha Election 2024: How many times absolute majority governments in the country? | किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

 नवी दिल्ली - आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत. १९८४ नंतर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला. त्यामुळे मतांची विभागणी होऊन ३० वर्षे युती-आघाडीची सरकारे सत्तेवर राहिली. २०१४ मध्ये भाजपने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. त्यांनाही फक्त ३१.४ टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसला १९८४ मध्ये मिळाली ४८.१% मते
काँग्रेसने १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८० आणि १९८४ साली पूर्ण बहुमताची सरकारे स्थापन केली. या सातही वेळी पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाला सर्वाधिक ४१५ जागा मिळाल्या तरीही त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ४८.१ इतकीच होती.

Web Title: Lok sabha Election 2024: How many times absolute majority governments in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.