बंगळुरू : मतदान केल्यानंतर मतदारांच्या बाेटाला विशिष्ठ प्रकारची शाई लावण्यात येते. ही शाई काही दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हैसूर पेंट्स ॲंड वाॅर्निश लिमिटेडने यंदाच्या लाेकसभा निवडणुकीसाठी शाईचा पूरवठा पूर्ण केला आहे. शाईची सर्वात माेठी खेप उतर प्रदेशला पाठविण्यात आली आहे. कर्नाक सरकारची ही कंपनी असून १९६२ पासून निवडणुकीसाठी लागणाऱ्या विशेष शाईचे उत्पादन करीत आहे.
एवढी शाई पुरविली _ २६.५५ लाखांपेक्षा जास्त बाटल्या.- ५५ काेटी रुपये एकूण किंमत.- ३.५८ लाख सर्वाधिक बाटल्या उत्तर प्रदेशला.- ११० सर्वात कमी बाटल्या लक्षद्वीपला.- २.६८ लाख महाराष्ट्र- १.९३ लाख बिहार- २.०० लाख प. बंगाल- १.७५ लाख तामिळनाडू- १.५२ लाख मध्य प्रदेश- १.५० लाख तेलंगणा- १.३२ लाख कर्नाटक- १.३० लाख राजस्थान