देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत एक विधान केले होते. या विधानावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने आपण त्यांचा आदर केला पाहिजे, असं काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले होते. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, मी स्वतः लाहोरला जाऊन त्यांची ताकद तपासली आहे. तिथे एक रिपोर्टर बोलत होता की, हाय अल्ला तौबा, हाय अल्लाह तौबा म्हणत होता. ते व्हिसाशिवाय पाकिस्तानात कसे आले? पाकिस्तानला घाबरायचे कशाला? एके काळी हा आमचा भाग होता, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ च्या घटनेचा उल्लेख केला, जेव्हा ते अचानक लाहोरला गेले होते. अफगाणिस्तानहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला पोहोचले होते आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. २५ डिसेंबर रोजी त्यांची भेट झाली, तेव्हा ते नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला गेल्याचे बोलले जात होते. पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांच्या आईला भेटवस्तूही दिल्या. त्यांच्या या भेटीची जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान मोदींच्या या अचानक भेटीकडे पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा एक पुढाकार म्हणून पाहिले जात होते.
पठाणकोट, उरी आणि त्यानंतर पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर दिले होते. "काँग्रेसचे लोक पाकिस्तानचा आदर आणि भीती बाळगण्याविषयी बोलतात. पाकिस्तानला घाबरायचे कशाला?, असंही मोदी सभेत म्हणाले.
लोकसभेसाठी पाच टप्प्यातील मतदान पूर्ण
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत . एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सहावा आणि सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.