पाटणा : राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे १५.८२ कोटींची तर त्यांचे पती समरेश सिंह यांच्याकडे १९.८६ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
शपथपत्रानुसार, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत भाडे आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. तथापि, त्यांच्या पतीने कर्ज घेतलेले आहे. रोहिणी यांच्याकडे पाच बँक खाती आणि २० लाख रुपयांची रोख रक्कम असून, २९.७० लाख रुपये किमतीचे सोन्याचे तर ३.८५ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या पतीची सात बैंक खाती असून, त्यांच्याकडे १० लाख रुपये रोख तसेच २३.४० लाख रुपयांचे सोन्याचे व २.८० लाखांचे चांदीचे दागिने आहेत. या दाम्पत्याला अयना सिंह, आदित्य सिंह आणि अरिहंत सिंह, अशी तीन अपत्ये आहेत. त्यांची मुलगी अयनाकडे ३३५ ग्रॅम तसेच आदित्य आणि अरिहंतकडे अनुक्रमे १८५ ग्रॅम, १५० ग्रॅम सोने आहे. त्यांनी २०१२-२३ दरम्यान ३.१६ लाख रुपये कमावले आहेत.