लोकसभा निवडणूक: पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्ती पाहून थक्क व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:49 AM2024-04-19T10:49:52+5:302024-04-19T10:51:26+5:30
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting: आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे.
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting: आज(19 एप्रिल 2024) लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. या पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्यांमधील 102 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशा पाच उमेदवारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.
नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'
टॉप 5 उमेदवारांच्या यादीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आणि छिंदवाडा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यशिवाय, AIADMK चे अशोक कुमार, भाजपचे देवनाथन यादव, भाजपच्या माला राज्य लक्ष्मी शाह आणि बहुजन समाज पार्टीचे (BSP) माजीद अली यांचाही समावेश आहे.
कोणाची संपत्ती किती?
1. नकुल नाथ
एकूण संपती- 716 कोटी
मतदारसंघ- छिंदवाडा
पक्ष- काँग्रेस
2. अशोक कुमार
एकूण संपती- 662 कोटी
मतदारसंघ- इरोड
पक्ष- AIADMK
3. देवनाथन यादव
एकूण संपती- 304 कोटी
मतदारसंघ- शिवगंगा
पक्ष- भाजपा
4. माला राज्य लक्ष्मी शाह
एकूण संपती- 206 कोटी
मतदारसंघटिहरी गडवाल
पक्ष- भाजपा
5. माजिद अली
एकूण संपती- 159 कोटी
मतदारसंघ- सहारनपूर
पक्ष- बीएसपी