काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस ठोस पावले उचलून 'रोजगार क्रांती' सुरू करेल. तरुणांचे भवितव्य उज्वल होईल याची काँग्रेस गॅरेंटी देतं असं म्हटलं आहे. तसेच युवा न्याय गॅरेंटीचा पुनरुच्चार केला, जी पक्षाने सत्तेत आल्यास अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस पक्ष युवा न्याय गॅरेंटीद्वारे 'रोजगार क्रांती' आणेल. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी आणि तरुणांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलू.''
"भारती भरोसा' हमी अंतर्गत, त्यांचा पक्ष रोजगार कॅलेंडरनुसार 30 लाख नवीन केंद्र सरकारच्या नोकऱ्या देईल. 'पहेली नौकरी पक्की' अंतर्गत, पक्ष सर्व शिक्षित तरुणांना प्रति वर्ष 1 लाख रुपये दराने एक वर्षाच्या एप्रेंटिसशिपचा अधिकार देईल. 'पेपर लीकपासून स्वातंत्र्य' या हमी अंतर्गत, पक्ष सर्व पेपर लीक पूर्णपणे बंद करण्यासाठी कायदा आणेल" मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
पक्षाने 'गिग वर्कर्स'साठी चांगली कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा आणि तरुणांसाठी 5,000 कोटी रुपयांचा 'स्टार्टअप फंड' देण्याचे आश्वासन दिले आहे. करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘गिग वर्कर’ म्हणतात. महिला न्याय, युवा न्याय, कामगार न्याय, शेतकरी न्याय आणि समान न्याय या पाच न्याय तत्त्वांनुसार काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या 25 गॅरेंटीवर लक्ष केंद्रित केले आहे. सत्तेत आल्यास त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन खरगे यांनी दिले आहे.