- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक सभांचे आयोजन कमकुवत जागांवर केले जात आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील चित्र बदलेल, असे भाजपला वाटते. महाराष्ट्रात मोदी १८ सभा घेणार आहेत. ही संख्या २४ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
भाजपने ३७० जागा जिंकण्याच्या उद्देशाने प्रचार सुरू केला आहे. मोदी यांनी पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, सोप्या जागांवर प्रचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पंतप्रधान फक्त अशाच जागांवर प्रचारासाठी जातील जिथे त्यांच्या सभांमुळे परिस्थिती बदलू शकते व ज्या जागा अवघड मानल्या जात आहेत.
यूपीत सर्वाधिक सभाउत्तर प्रदेश - ३०बिहार - १८ पश्चिम बंगाल - १८ गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीत मोदींच्या सभा सर्वांत कमी होतील. दक्षिण भारतात कर्नाटकमध्ये डझनभर सभाही प्रस्तावित आहेत.