शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:38 PM

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 

"सीएम नितीश ४ जूननंतर कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात. नितीशकुमार आपला पक्ष वाचवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतात, असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदलाच्या अफवाही वाढल्या आहेत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा सांगितले आहे की ते भाजप सोडून कुठेही जात नाहीत.

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पाटण्यात माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना विचारले की नितीश कुमार सोबत येणार का? त्यावर त्यांनी ४ जूनपर्यंत थांबा, असे उत्तर दिले. 

दुसरीकडे, इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश कुमार भाजपासोबत गेल्यानंतरही तेजस्वी यादव यांनी त्यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. तेजस्वी यांदव अनेकदा बोलताना सांगतात की, त्यांचे काका नितीश कुमार हे पालकासारखे आहेत. याआधीही त्यांचा आदर केला आणि भविष्यातही करत राहतील. 

मोदींची मोठी भविष्यवाणी

मोदी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल."

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी डाव्यांचा पार सुपडा-साफ झाला होता. गेल्या निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशत भाजपला मोठा फायदा झाला होता. येथे भाजपने एकूण 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या, बसपाला 10, सपाला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitish Kumarनितीश कुमार