शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
3
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
4
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
5
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
6
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
7
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
8
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
9
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
10
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
11
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
12
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
13
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
14
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
15
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
16
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
17
Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
18
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
19
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
20
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

कार आणि घरही नाही, राहुल गांधींची संपत्ती ५ काेटींनी वाढली, शपथपत्रातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:05 IST

Rahul Gandhi's wealth: राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे.

वायनाड - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या बहीण व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न घटले आहे. आयकर विवरणातील ही माहिती त्यांनी दिली आहे. 

राहुल गांधी यांच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत.  तसेच ‘माेदी’ नावावरुन केलेल्या वक्तव्यप्रकरणी त्यांना दाेन वर्षांची शिक्षा ठाेठाण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी शपथपत्रात केला असून या शिक्षेविराेधात त्यांनी याचिका दाखल केल्याचेही म्हटले राहुल यांनी आहे.

वायनाडच्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमीच त्यांच्या सोबत असेन असे राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजिलेल्या रोड शोप्रसंगी केलेल्या भाषणात म्हटले. वायनाड येथे राहुल गांधी यांचे सकाळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कालपेट्टा ते सिव्हिल स्टेशनपर्यंत रोड शो केला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.

गेल्या चार निवडणुकांवेळी एकूण संपत्ती आणि उत्पन्न२००४        ५५.३८ लाख२००९        २.३२ काेटी२०१४        ९.४० काेटी२०१९        १५.८८ काेटी    (आकडे रुपयांत) 

यंदा किती संपत्ती?२०.५० काेटी रुपयांची एकूण संपत्ती सध्याची. 

- उत्पन्न किती? : २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांचे १.०२ काेटी रुपये एकूण उत्पन्न हाेते.- २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.३१ काेटी एवढे उत्पन्न हाेते. त्यापुर्वीच वर्षी १.२९ काेटी रुपये उत्पन्न हाेते.

चल संपत्ती- ५५ हजार राेख रक्कम.- २६.२५ लाख रुपये बॅंकेच्या बचत खात्यात.- ४.३३ काेटी रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक.- ३.८१ काेटी रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक.- ६१.५२ लाख रुपये पाेस्ट व इतर विमा याेजनांमध्ये गुंतवणूक.- ३३३ ग्रॅम साेने, ४.२० लाख रुपये सध्याचे मुल्य.- १५.२१ लाख रुपयांचे साॅवरेन गाेल्ड बाॅंड.- ९.२४ काेटी रुपयांची एकूण गुंतवणूक.

स्थिर संपत्ती किती?- ११.१५ काेटी रुपयांची एकूण स्थिर मालमत्ता.- ३.७७ एकर वडिलाेपार्जित शेती. बहिण प्रियंका यांच्यासाेबत अर्धी भागीदारी.- २.१० लाख रुपये शेतीचे मूल्य राहुल यांच्या वाट्याचे.- ५,८३८ चाैरस फुटांचे कार्यालय गुरुग्राम येथे.- ९.०४ काेटी रुपये सध्याचे मूल्य.-४९.७९ लाख रुपये भाडेकरुंकडून घेतलेले डिपाॅझिट. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४