Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:18 AM2024-05-29T10:18:31+5:302024-05-29T10:26:14+5:30

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस आणि समाजवादी पक्ष दोन्ही एकत्र आल्याचं राहुल गांधी यांनी मंचावरून सांगितलं.

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi claim after 4 june goodbye bjp good bye Narendra Modi | Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये पोहोचले आहेत. देवरिया, गोरखपूर येथे राहुल गांधी यांनी मंगळवारी ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची भविष्यवाणी केली आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकीराकडे आता फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. इंडिया आघाडीला मतं मिळत आहेत 'खटाखट खटाखट'. आणि भाजपापासून देशाला मुक्ती मिळणार आहे, देशाचे खरे अच्छे दिन येणार आहेत - 'फटाफट, फटाफट' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष दोन्ही एकत्र आल्याचं राहुल गांधी यांनी मंचावरून सांगितलं. "सायकलवर पंजाची मजबूत पकड असते. विजय निश्चित आहे. इंडिया आघाडीचा क्लीन स्वीप होणार आहे. जागांची लाईन लागणार आहे खटाखट खटाखट. ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा!" असंही राहुल यांनी म्हटलं आहे. 

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये १३ जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये वाराणसी, गोरखपूर, मिर्झापूर, चंदौली, घोसी, गाझीपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, सलेमपूर, बलिया आणि रॉबर्टसगंज जागांचा समावेश आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi claim after 4 june goodbye bjp good bye Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.