राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत रविवारी जोधपूरला पोहोचले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांसह होळी स्नेह मिलन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जोधपूर लोकसभा उमेदवार करण सिंह उचियारडा यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केलं. यासोबतच माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पुन्हा एकदा संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मुद्द उपस्थित केला आहे.
"देशभरात वातावरण बदलत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील. देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, ज्यांना जनतेने मते देऊन निवडून दिले आहे. आता देशात खूप मोठी हुकूमशाही आहे. या निवडणुकीदरम्यान कोणत्याही नेत्याला प्रचार करता येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर सातत्याने लोकांच्या ठिकाणी छापे टाकत आहेत."
"संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रकरणामध्ये मी पीडितांसाठी आवाज उठवला होता. गजेंद्र सिंह शेखावत यांनी माझ्यावर मानहानीचा खटला दाखल केला. मी 10 हून अधिक अपील केले आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून ते माझ्याकडे आले होते. लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांचे व्यवहार हे गजेंद्र सिंह शेखावत यांच्या कुटुंबीयांमध्ये झाले आहेत."
"आता राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार बनले आहे, त्यांनी या प्रकरणातील वकिलांना फी भरण्याचे आदेश जारी केले आहेत, सरकार पैसे देणार नाही. आता फी कुठून आणणार, हा वेगळा मुद्दा आहे पण त्यांनी त्या सर्व गरीब कुटुंबांचा विचार करायला हवा" असं देखील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.