'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 03:14 PM2024-04-07T15:14:33+5:302024-04-07T15:15:48+5:30
'2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती, हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे.'
Narendra Modi Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यात मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज त्यांनी बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, 'ते म्हणतात की मोदींनी गॅरंटी देणे योग्य नाही, त्यावर बंदी घातली पाहिजे. मोदींनी दिलेली गॅरंटी बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझी नियत साफ आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझ्यात ती पूर्ण करण्याची ताकद आहे, असं मोदी म्हणाले.
गरीब का बेटा मोदी, गरीब का सेवक है।
— BJP (@BJP4India) April 7, 2024
मैं जब तक देश के हर भाई-बहन की गरीबी दूर नहीं कर लूंगा, चैन से नहीं बैठूंगा।
- पीएम श्री @narendramodi
पूरा देखें: https://t.co/lDI7KwPToLpic.twitter.com/27RsiLjpqN
विरोधकांच्या मनात श्रीरामाविषयी वैर
जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचा भव्य सोहळा झाला, त्या सोहळ्याकडे बहुतांश विरोधी पक्षांनी पाठ फिरवली होती. अशा नेत्यांवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल, अशी गॅरंटी मी दिली होती, आज मंदिर बांधून तयार आहे. राम मंदिराचे काम थांबवण्यासाठी काँग्रेस आणि राजदने वर्षानुवर्षे प्रयत्न केले, पण अखेर ते पूर्ण झाले. विरोधकांच्या मनात भगवान राम, अयोध्येशी काय वैर आहे की, त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला एवढा विरोध केला. त्यांच्या मनात इतके विष भरले आहे की, त्यांच्या पक्षातील काही लोक सोहळ्यात सामील झाले म्हणून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मोदी की गारंटियां इंडी गठबंधन को पसंद नहीं आ रही हैं। इंडी गठबंधन के एक बहुत बड़े नेता ने कहा है कि मोदी जो आपको गारंटी देता है, उस पर बैन लगना चाहिए।
— BJP (@BJP4India) April 7, 2024
मोदी गारंटी इसलिए देता है, क्योंकि उसके पास गारंटी पूरी करने का माद्दा है, साफ नीयत है।
- पीएम श्री @narendramodi
पूरा देखें:… pic.twitter.com/2U5iRDS9Bs
रामनवमी येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका...
रामनवमी येत आहे, ही पापे करणाऱ्यांना विसरू नका. त्यांनाही माहितेय की, मोदींच्या गॅरंटीमुळे त्यांची दुकान बंद होत आहे, म्हणूनच हे लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत. इंडिया आघाडीकडे ना दूरदृष्टी आहे, ना विश्वासार्हता आहे. ते दिल्लीत एकत्र येतात आणि आपापल्या राज्यात एकमेकांना शिव्या देतात. ते बळजबरीने एकत्र आले आहेत. INDIA आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तींचे घर आहे. या आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच ते पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात, अशी घणाघाती टीका मोदींनी यावेळी केली.
कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष कहते हैं, 370 का राजस्थान से क्या लेना देना, तो मैं बता दूं कि इसी कश्मीर की रक्षा के लिए देश के कितने ही नौजवान तिरंगे में लिपट कर लौटे हैं।
- पीएम श्री @narendramodipic.twitter.com/NSoqabi9Mp— BJP (@BJP4India) April 7, 2024
मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही
गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मोदीचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही, तर कष्ट करण्यासाठी झाला आहे. मी देशातून गरिबी हटवण्याच्या मिशनमध्ये गुंतलो आहे. तुमच्याप्रमाणे मीही गरिबीत पुढे आलोय. 2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, गरिबांना मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे. गेल्या दहा वर्षांत सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी जे काम केले, ते स्वातंत्र्याच्या सहा दशकातही झाले नाही. जोपर्यंत गरिबी हटवत नाही, तोपर्यंत मला शांत झोप येणार नाही. ता देशातील माझ्या कुटुंबीयांनी तिसऱ्यांदा मजबूत सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.