Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या मतदानानंतर आता निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी सुरू झाली. त्यानंतर आता ईव्हीएमच्या मतांची मोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. देशात एनडीए सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की, इंडिया आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालातील सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने मोठी झेप घेतली असून, इंडिया आघाडी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांनुसार २५० जागांवर एनडीए पुढे आहे. तर इंडिया आघाडी १०० जागांवर पुढे आहे. हे सुरुवातीचे कल असून, ते वेगाने बदलताना दिसत आहेत. गांधीनगर येथून भाजपा उमेदवार अमित शाह ३५ हजार मतांनी पुढे आहेत. तर गया मतदारसंघातून जीतन राम मांझी पुढे आहेत. कंगना राणौत मंडी येथून आघाडीवर आहे. जालंधर मतदारसंघातून काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी पुढे आहेत. पाटणा साहिबमधून रविशंकर प्रसाद पुढे आहेत. आतापर्यंत एकूण ३७१ पेक्षा जागांचे कल आले असून, त्यात भाजप २५० जागांवर पुढे आहे. इंडिया आघाडी १३५ जागांवर पुढे आहे.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आघाडीवर
वाराणसीमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. गोरखपूर विधानसभेत भाजपाचे रवी किशन आघाडीवर आहेत. फतेहपूरमध्ये भाजपाच्या साध्वी निरंजन ज्योती पोस्टल बॅलेटमध्ये आघाडीवर आहेत. दिल्ली ईशान्य मतदारसंघातून भाजपाचे मनोज तिवारी पुढे आहेत. तिरुअनंतपुरम जागेवर शशी थरूर मागे आहेत. भाजपाचे राजीव चंद्रशेखर पुढे आहेत. रायबरेलीत पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी पुढे आहेत. केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी १०३ मतांनी पुढे आहेत.
गुनामध्ये भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया पुढे आहेत. अखिलेश यादव कन्नौजमधून पुढे आहेत. कर्नाल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मनोहर लाल खट्टर पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. भाजपा १७ जागांवर तर टीएमसी १८ जागांवर आघाडीवर आहे.