'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 12:42 PM2024-05-09T12:42:40+5:302024-05-09T12:52:52+5:30
काल सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असं धक्कादायक विधान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.या वादग्रस्त विधानामुळे सॅम पित्रोदा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. त्यांच्या वक्तव्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता पित्रोदा यांच्या वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याला बकवास ठरवलं आहे.
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
वाड्रा म्हणाले, 'जेव्हा तुम्ही या कुटुंबाशी जोडले असता, तेव्हा मोठी जबाबदारी येते, तेव्हा कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल. सॅम पित्रोदा जे बोलले ते मला अजिबात पटत नाही. मिस्टर सॅम पित्रोदा यांनी जे काही उच्चारले आहे ते मूर्खपणाचे आहे, एवढा सुशिक्षित माणूस असे कसे बोलू शकतो? ते राजीवजींच्या खूप जवळ होते, असंही वाड्रा म्हणाले.
वाड्रा पुढे म्हणाले, 'जर तुम्हाला या कुटुंबात सामील होण्याची संधी मिळाली असेल, तर तुम्ही शहाणपणाने पावले उचलली पाहिजेत. राहुल प्रियंका आणि काँग्रेस खूप मेहनत घेत आहेत आणि तुमच्या एका विधानामुळे भाजपला अनावश्यक मुद्दे उपस्थित करण्याची संधी मिळाली.
रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, 'मी राजकारणात आहे कारण प्रत्येक व्यक्ती मला राजकीय दृष्टिकोनातून पाहतो की जे प्रश्न आणि उत्तरे दिली जातील ती राहुल गांधींशी संबंधित आहेत. लोकांची अपेक्षा असते की तुम्ही म्हणाल तर सर्वकाही होईल आणि तुम्ही हो म्हणाल तर सर्वकाही होईल. मी सहवासात आल्यापासून सर्वांनी माझ्याकडे कोणी उद्योगपतीसारखे पाहिले नाही. त्यांनी माझ्याकडे राजकारणी म्हणून पाहिले आहे.