शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 3:31 PM

Parneet Kaur Joins BJP: पतियाळाच्या काँग्रेस खासदार परनीत कौर भाजपमध्ये सामील झाल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार परनीत कौर (Parneet Kaur) यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

पतियाळाच्या खासदार परनीत कौर, या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. पंजाबमधील 'रॉयल ​​सीट' पटियाला येथून त्या चार वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, 'मी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करत आहे. मी गेली 25 वर्षे लोकशाहीसाठी काम केले. यापुढेही करत राहीन. 

त्या पुढे म्हणाल्या की, 'पंतप्रधान मोदीजींचे कार्य आणि विकसित भारताच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण आपली मुले आणि देश सुरक्षित ठेवू शकतो. पीएम मोदी, जेपी नड्डा आणि भाजपचे आभार मानते.' दरम्यान, प्रतीन कौर यांना भाजप पटियालातून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यापूर्वीच भाजपमध्ये आलेपंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आपल्या मुलांसह सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपला पक्षदेखील भाजपमध्ये विलीन केला आहे. आता त्यांच्या पत्नीदेखील अधिकृतपणे भाजपमध्ये आल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबBJPभाजपाlok sabhaलोकसभा