Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:29 PM2024-05-13T12:29:53+5:302024-05-13T12:42:41+5:30
Lok Sabha Election 2024 And Sonia Gandhi : सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. सोनिया गांधी यांनी सोमवारी (13 मे 2024) एक व्हिडीओ संदेश जारी केला.
"स्वातंत्र्य लढ्यापासूनच आधुनिक भारताच्या उभारणीत महिलांनी मोठी भूमिका बजावली आहे. आज महिलांना महागाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही क्रांतिकारी गॅरंटी घेऊन आलो आहोत. काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार आहेत."
नमस्ते मेरी प्यारी बहनों 🙏🏼
— Congress (@INCIndia) May 13, 2024
स्वतंत्रता की लड़ाई से लेकर आधुनिक भारत बनाने में महिलाओं का बहुत बड़ा योगदान रहा है।
हालांकि आज हमारी महिलाएं भयंकर महंगाई के बीच संकट का सामना कर रही हैं।
उनकी मेहनत और तपस्या के साथ न्याय करने के लिए कांग्रेस एक क्रांतिकारी कदम लेकर आई है।… pic.twitter.com/Wk7JGt8x7r
"आमच्या गॅरंटीमुळे कर्नाटक आणि तेलंगणातील कोट्यवधी कुटुंबांचं जीवन आधीच बदललं आहे. मनरेगा असो, शिक्षणाचा अधिकार असो की अन्नसुरक्षेचा अधिकार असो. आमच्या या योजनांनी लाखो कुटुंबांना बळ दिलं आहे. हे काम पुढे नेण्यासाठी महालक्ष्मी ही आमची सर्वात नवीन गॅरंटी आहे."
"या कठीण काळात काँग्रेसचा हात तुमच्या पाठीशी आहे. या कठीण काळात काँग्रेसचा हातच तुमची परिस्थिती बदलेल" असं म्हणत काँग्रेसने सोनिया गांधी यांचा व्हिडीओ संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.