राजेंद्र कुमारलखनाै : उत्तर प्रदेशातील राजकारणात लखनाै आणि माेहनलालगंज या मतदारसंघाचे खास वैशिष्ट्य आहे. लखनाैमधून २०१४ पासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सलग दाेनदा जिंकले आहेत. आता ते हॅटट्रिक करणार का? याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी माेहनलालगंज येथून भाजपने काैशल किशाेर यांना उमेदवारी दिली आहे. तेदेखील २०१४ पासून दाेन वेळा जिंकले आहेत. या दाेघांच्याही प्रचारासाठी त्यांच्या मुलांनी प्रचारात स्वत:ला झाेकून दिले आहे. एवढेच नव्हे तर, दाेन्ही नेत्यांच्या विराेधात उतरलेल्या उमेदवारांची मुले-मुली देखील बाबांसाठी घाम गाळत आहेत.
दाेन्ही जागा देशातील हायप्राेफाईल मतदारसंघात गणल्या जातात. राजनाथ सिंह यांच्यासाठी त्यांची दाेन्ही मुले पंकज आणि नीरज प्रचार करत असून, नुक्कड सभा, बैठकांमध्ये रणनीती आखत आहेत. माेहनलालगंजमध्ये विकास आणि प्रभात हे दाेघेही बाबा काैशल किशाेर यांच्यासाठी बूथ अध्यक्ष, मंडल, पन्ना प्रमुखांसाेबत बैठका करत आहेत. नुक्कड सभांमधूनही ते मतदारांसमाेर जात आहेत.
मुलीही वडिलांच्या प्रचारातबसपाचे उमेदवार सरवर मलिक यांच्या दाेन मुली नाैशीन आणि उरूज यांनी वडिलांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. विविध भागात महिलांसाेबत बैठकांमध्ये सहभागी हाेत असून वडिलांसाठी मते मागत आहेत.
प्रचारासाेबत बाबांच्या औषधांकडेही लक्षइतर उमेदवारांचीही मुले-मुली भीषण गरमीतही घराेघरी जाऊन वडिलांसाठी मते मागत आहेत. राजनाथ सिंह यांच्याविराेधात लढणारे सपाचे उमेदवार रविदास मल्हाेत्रा यांचे पुत्र शिवम हे सकाळी १० वाजताच घराबाहेर पडून बाबांसाठी प्रचाराला सुरूवात करतात. दरराेज ते सुमारे १० तास प्रचार करतात. त्याचवेळी ते वडिलांची औषधे तसेच जेवणाकडेही लक्ष ठेवतात.
मुख्यमंत्री म्हणतात, माेदींसारखा नेता पाकिस्तानलाही हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आम्हालाही मिळायला हवा, अशी पाकिस्तानातील राजकारण्यांचीही इच्छा आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका प्रचारसभेत सांगितले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता पाकिस्तानात हवा होता अशी इच्छा त्या देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही व्यक्त केली होती. मोहन यादव यांनी सांगितले की, काँग्रेसनेच भारतात दुहीची बीजे पेरली. त्यामुळेच देशाची फाळणी झाल्याची टीका त्यांनी केली.