Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:03 PM2024-05-30T17:03:35+5:302024-05-30T17:05:45+5:30

Lok Sabha Election : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदानाआधीच सट्टाबाजारातील कल समोर आले आहेत.

lok sabha election 2024 survey of Phalodi Satta market has come out, will BJP benefit or India alliance | Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती

Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती

Lok Sabha Election ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून हा शेवटचा आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हीकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. यातच आता फलोदी सट्टा बाजार चर्चेत आला आहे. या सट्टा बाजाराचे आकडेही समोर आले आहेत. उत्तर प्रदेशमधील हा सर्वे आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी जाहीर झालेल्या या नव्या सर्वेक्षणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जास्त जागा दाखवत होत्या, मात्र आता या नव्या सर्वेक्षणात समीकरणे बदललेली दिसत आहेत. (Lok Sabha Election 2024)

"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप

फलोदी सट्टा बाजारच्या आतापर्यंतच्या दाव्यांवर नजर टाकली तर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये नुकसान होताना दिसत नाही. आताच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीतही भाजप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशातील एकूण ८० लोकसभा जागांपैकी ६४ जागा मिळवण्यात यश आले. आत्तापर्यंतच्या अहवालांमध्ये हाच अंदाज वारंवार मांडला जात होता. आता, फलोदी सट्टा बाजारच्या नव्या सर्वेक्षणानुसार, यावेळी उत्तर प्रदेशात भाजप ५५ ते ६५ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे, तर इंडिया आघाडी मजबूत असल्याचेही दिसून येत आहे. यावेळी इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशामध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा दिल्या जात आहेत. (Lok Sabha Election 2024)

उत्तर प्रदेशातील या जागांवर देशाचे लक्ष 

उत्तर प्रदेशातील काही हॉट सीट्स आहेत ज्यावर राजकीय वर्तुळापासून सट्टा बाजारापर्यंत विशेष लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सहारनपूर, मेरठ, नगीना, मुझफ्फरनगर, लखनौ, सुलतानपूर, अमेठी, रायबरेली, वाराणसी, केसरगंज, घोसी, गौतम बुद्ध नगर या जागांचा समावेश आहे. याचे कारण इम्रान मसूद सहारनपूरमधून, अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर नगीना मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत. स्मृती इराणी अमेठीतून तर मनेका गांधी सुलतानपूरमधून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. सट्टेबाजीच्या बाजारातही या जागांसाठी मोठी क्रेझ आहे. आता या जागांवर फेरसर्वेक्षण केल्यानंतर बदललेले आकडे जाहीर केले जात आहेत. (Lok Sabha Election 2024)

देशातील सट्टा बाजाराचे अंदाज टप्प्याटप्प्याने बदलत आहेत. १३ मे रोजी सट्टा बाजाराने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात असे म्हटले होते की, यावेळी लोकसभा निवडणुकीत जवळपास ३०० जागा भाजपला मिळत आहेत. याउलट काँग्रेस पक्ष फक्त ४० ते ४२ जागांवर घसरला. एवढेच नाही तर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ५२ जागा या वेळी मिळत नसल्याचेही सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यानंतर हे अंदाज फसले. त्यानंतरच आठवडाभरानंतर फलोदी सट्टा बाजारचा नवा अंदाज प्रसिद्ध झाला असून त्यात भाजपचा आलेख ३०० जागांच्या खाली तर एनडीए ८० ते ८५ जागांवर घसरल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे हे अंदाज टप्प्याटप्प्याने बदलत राहिले. आता नव्या अंदाजानुसार काँग्रेसच्या जागांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दाखवले आहे. 

Web Title: lok sabha election 2024 survey of Phalodi Satta market has come out, will BJP benefit or India alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.