Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. अशातच, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. एका बातमीचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले की, चार मुलांनी परीक्षेत 'जय श्री राम' लिहिले अन् परीक्षकांनी त्यांना 50 टक्के गुण दिले.
नावांचा उल्लेख करत ओवेसी म्हणतात, मला त्या चार मुलांची नावे कळली आहेत. यामध्ये पहिले नाव नरेंद्र मोदी, दुसरे नाव अमित शहा, तिसरे नाव योगी आणि चौथे नाव नड्डांचे आहे. त्यांनी काहीही केले नाही, तरीपण त्यांना मत द्या. हे लोक परीक्षेत 'जय श्री राम' लिहून 50 टक्के गुण मिळवतात. आमची मुलगी हिजाबमध्ये जाते, तर परीक्षेला बसू दिले जात नाही.
संबंधित बातमी- "मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
काय आहे प्रकरण ?उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत जय श्री राम आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिली होती. मात्र, परीक्षकांनी त्यांना 56 टक्के गुणांसह पास केले. या घटनेची मीडियात खुप चर्चा झाली. याचाच उल्लेख करत ओवेसींनी मोदी-शहांवर निशाणा साधला.