आंध्र प्रदेशातील नरसापुरममधून भाजपा नेते भूपतीराजू श्रीनिवास वर्मा यांना यावेळी पक्षाने तिकीट दिलं आहे. तिकीट मिळताच ते इतके भावूक झाले की ते सर्वांसमोर ढसाढसा रडू लागले. तिकीट मिळाल्याच्या आनंदात ते पक्षाच्या निवडणूक चिन्हासमोर नतमस्तक झाले.
तब्बल 30 वर्षांनंतर पक्षाने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने ते ढसाढसा रडू लागल्य़ाची माहिती समोर येत आहे. निवडणूक चिन्हाला साष्टांग दंडवत घातल्याचा एक व्हिडीओही समोर आला असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
भूपतीराजू श्रीनिवास यांनी स्वतः हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील शेअर केला आहे. "माझे आयुष्य कमळासाठी समर्पित आहे. हे 30 वर्षांच्या कठोर मेहनतीचे फळ आहे'' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. भूपतीराजू श्रीनिवास वर्मा हे भाजपा, टीडीपी आणि जनसेना यांचे संयुक्त उमेदवार आहेत.
गेल्या 30 वर्षांपासून भूपतीराजू हे भाजपामध्ये काम करत आहेत, मात्र आजपर्यंत त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, मात्र यावेळी पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांना उमेदवारी दिली. सध्या ते आंध्र प्रदेशचे भाजपाचे राज्य सचिव आहेत. आंध्र प्रदेशात 19 एप्रिल रोजी निवडणुका होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.