मेघना ढोके (संपादक, लोकमतसखी. कॉम)
आसाममधल्या चार जागा वगळल्या, तर आसामसह ईशान्य भारतासाठी लोकसभा निवडणूक आता संपलीच आहे. ईशान्य भारतात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत आणि त्यापैकीही १४ जागा एकट्या आसाममध्ये आहेत, म्हणजे वा राज्यांचे लोकसभेतलं प्रतिनिधीत्व अल्प असूनही मतदानाची टक्केवारी मात्र वेगळं चित्र सांगते. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे.
मग प्रश्न असा आहे की उर्वरित भारतापेक्षा ईशान्य भारतात मतदानाचा टक्का जास्त का दिसतो? अशांतता, आतंकवाद, संप-बंद-मोर्चे, दगली यांनी होरपळणाऱ्या इथल्या माणसांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावं, असं का वाटतं?
आजवरची मतदान आकडेवारी काय सांगते?
ईशान्य भारत : लोकसभेच्या एकूण जागा २५
८०% पेक्षा जास्त मतदान ३० वेळा ईशान्य भारतात झाले,-९२%८४%७८%
विकासाचं वारं अत्यंत मंदगतीनेज्या भागात पोहोचलं तिथली ही माणसं
(आकडेवारी सौजन्य : मतदानसंबंधित विविध बातम्या)वास्तव काय सांगतं?
वास्तव काय सांगतं?
• ज्या राज्यांमध्ये आता कुठे रस्त्यांचं जाळ निर्माण होत आहे. दूर अलगथलग पडलेल्या या भागात मोबाइल नेटवर्क पोहोचत आहेत. आजही एकाच राज्यातल्या दुर्गम भागातल्या दोन गावांत जायचं, तर शेजारच्या राज्यात जाऊन लांब वळसा घालून यावं लागतं है वास्तव आहे, कारण राज्यांतर्गत रस्ते अजूनही कमी आहेत.
• आपल्या राज्याच्या राजधानीतून विमान उडू लागली आणि तिथून केवळ तीन तासांत मुंबई-चेन्नई गाठता येतं याचं अजूनही तिथल्या माणसांना अप्रूप वाटतं, कारण मोठी शहरे गाठायला चार-चार दिवसांचा खडतर प्रवास अनेकांनी केलेला आहे.
• सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवावा, अशी डोळे दिपावणारी व्यवस्था तर तिथंही नाही, मग तरी मतदानाचं प्रमाण जास्त आहे त्याची कारण स्वातंत्र्यानंतर आजवर केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं, तरी ती तशीच राहिलेली आहेत. ती बदलत नाही कारण तिकडचे प्रश्न वेगळे आहेत.
मतदान जास्त होण्याची काही कारणं
१) सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ईशान्य भारतात निवडणुका हा एक उत्सव असतो. मत देण्यापासून बहिष्कार टाकण्यापर्यंत आणि प्रचारापासून ते मतदारांना चारचाकीच काय, पण विमानाचं तिकीट देऊन मतदानाला येण्याचं आमंत्रण देण्यापर्यंत. मैदानी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश येथील मतदारांची संख्या,
२)लोकसंख्येची घनता, उमेदवारांशी प्रत्यक्ष असलेली • ओळख आणि समूहानं राहण्याची वृत्ती, हे सारं मतदानाला पूरक ठरते.
३)ईशान्य भारतात सार्वजनिक व्यवहारात महिला जास्त • आघाडीवर दिसतात. त्यामुळे महिला मतदारांचं मतदानाचं प्रमाण जास्त आहे.
४)सरकारी नोकऱ्या हा उत्पन्न आणि जगण्याची सुरक्षितता यासाठीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. खासगी क्षेत्रापेक्षा आजही सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण आणि त्यावर भरवसा, त्याला असलेलं ग्लॅमर अधिक आहे. सरकारी यंत्रणावर रोजच्या जगण्यात अनेकदा अवलंबून राहाव लागत.
५) विशेषतः ही सर्व राज्य केंद्रावर निधीसाठी अवलंबून असतात, त्यामुळे दिल्लीत ज्याची सत्ता त्याच्याशी जमवून घेणं हा येथील राज्यांचा शिरस्ता आहे.