शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 7:40 AM

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्लॅन बी लागू केला आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्लॅन बी लागू केला आहे. प्लॅन बी म्हणजे तुमच्या पक्षात विजयी होऊ शकणारे नेते नसतील तर इतर पक्षांच्या नेत्यांना तिकीट द्या. त्यानुसार, काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांच्या नेत्यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना तिकीटही देण्यात आले आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना अमरावतीतून तिकीट दिले आहे. लुधियानामधून काँग्रेस नेते रवनीत सिंग बिद्व, पटियालामधून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर, कुरुक्षेत्रमधून काँग्रेस नेते नवीन जिंदाल, सिरसामधून काँग्रेस नेते अशोक तंवर, जालंधरमधून आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार, भर्तृहरी मेहताब यांना कटकमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांत नाराजी आहे. महताब यांनी नुकताच बीजेडीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

१०१ खासदारांचे कापले तिकीटलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बाजूला करून पक्षाबाहेरील नेत्यांना तिकिटे दिली. आतापर्यंत भाजपने २९१ पैकी २ १०१ विद्यमान खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक १४ खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. भाजपने एकापाठोपाठ एक काँग्रेस, आप आणि बीजेडीच्या नेत्यांना तिकीट वाटप केले आहे.मेरठ, मंडीमध्ये उमेदावारी नव्या 'प्लॅन' नुसारच?मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल आणि मंडीमध्ये अभिनेत्री कंगना राणौत यांना भाजपने तिकीट दिले आहे. स्थानिक दावेदारांमध्ये मात्र त्यामुळे निराशा आहे. भाजपचे नेते आता हा प्रत्यक्षात प्लॅन बी चा भाग असल्याचे सांगत आहेत. जेव्हा आपलेच नेते जिंकू शकत नाहीत तेव्हा इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन तिकीट द्या, असा हा प्लॅन आहे. त्यानुसार भाजपने अनेक राज्यांमध्ये लोकसभेसाठी तिकीट वाटप केले आहे. प्लॅन बी कितपत यशस्वी होतो हे निकाल सांगणार आहेत.अनेक उमेदवारांची माघार, पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्टलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यचा शनिवारी अखेरचा दिवस होता. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान होणार आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाj. p. naddaजे. पी. नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी