Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखत आहेत. सत्ताधारी भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षांनी बैठका सुरू केल्या आहेत. विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल, यावर अद्याप एकमत झाले नाही. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विचारण्यात आले की, तुम्ही 2024 मध्ये स्वत:ला विरोधी पक्षाचा चेहरा मानतात का? या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ.
पीडीए एनडीएचा पराभव करणारसपा अध्यक्ष अखिलेश यादव मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजप विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे मुद्दे उपस्थित करते की, विरोधकांना चेहराच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि सर्वांची प्रादेशिक ताकद वाढली आहे. आमच्याकडे चेहरे खूप आहेत, पण भाजपकडे चेहरा नाही. यावेळी पीडीए(विरोधी पक्ष) एनडीएचा पराभव करणार.
येत्या काही दिवसांत भाजप संपणार अखिलेश पुढे म्हणाले की, हे सरकार असे आहे की, टोमॅटोची बातमी दाखवली तर खवळते. आज एवढी महागाई आहे, पीठ, तांदूळ, डाळी, पेट्रोल सगळेच महागले आहे आणि सरकार काही लोकांना फायदा देण्याचे काम करत आहे. मी मुंबईत एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलो होतो. पण, मी काही नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्रात बरेच फेरबदल झाल्याचे ऐकले. आता बातम्या येत आहेत की, समाजवादी पार्टी यूपीमधून फुटणार आहे. मी म्हणतो की येत्या काही दिवसांत भाजप संपेल. भाजप समाजात फूट पाडण्याचे काम करते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.