शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार? काँग्रेस खासदाराने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 1:02 PM

Rahul Gandhi : देशात एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे, एनडीएच्या सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

Rahul Gandhi ( Marathi News ) :  लोकसभेचे निकाल समोर आले असून एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. एनडीए केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. या पदासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांनी केली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी केली आहे.

नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

मणिकम टागोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'वर पोस्ट करत लिहिले की, “मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावावर मते मागितली आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी हे लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे माझे मत आहे. मला आशा आहे की इतर काँग्रेस खासदारही माझ्यासारखाच विचार करतील. बघूया काँग्रेस संसदीय पक्ष काय निर्णय घेते. आम्ही लोकशाहीवादी पक्ष आहोत.

लोकसभेत विरोधी पक्षनेते होण्यासाठी १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा असणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या आणि २०१९ मध्ये ५२ जागा जिंकल्या होत्या, यावेळी पक्षाने ९९ जागा जिंकल्या आहेत. यावेळी राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. आघाडीतील जागांच्या बाबतीतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.

'एनडीए'मध्ये जदयूने केल्या मोठ्या मागण्या

देशात एनडीए सरकार स्थापन करणार आहे. नितीशकुमार यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता जदयूने काही मागण्या केल्या आहेत. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. जदयूचे महासचिव आणि प्रवक्ता के सी त्यागी यांनी सांगितले की या मुद्द्यांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे तेव्हाही सांगितले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल