लोकसभा निवडणुकीसाठी देशात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने अनेक धक्के देत या निवडणुकीची तयारी केली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून वरुण गांधी यांना तिकीट नाकारले आहे. तेव्हापासून वरुण गांधी समाजवादी पक्ष किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार तयारी सुरू आहे.दरम्यान, आता या चर्चेवर मनेका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यलोबत बोलताना मनेका गांधी यांना वरुण गांधी भाजपा सोडणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी मनेका गांधी म्हणाल्या, "मला याची माहिती नाही. मला त्यांचा अभिमान आहे, त्यांनी आयुष्यात अतिशय हुशारीने काम केले आहे.
खासदार मनेका गांधी म्हणाल्या की, "मी मंत्री झाले नाही, तेव्हा सुलतानपूरच्या लोकांनी खंत व्यक्त केली होती, त्यानंतर मी तिथल्या लोकांना सांगितले की, तुम्हाला कामाची काळजी आहे ना? जर काही कमतरता असेल तर, तुम्ही तर सांगा. माझी ताकद मंत्री होण्यात नाही, सेवा करण्यात आहे."
"भाजप हा केडर बेस पार्टी आहे. त्यांना मजबूत करण्यासाठी ५ ते १० वर्षे लागली आहेत. आता ते किती मेहनत घेतात ते बघू. यावेळी निवडणूक जिंकल्यानंतर मंत्री पदाच्या प्रश्नावर गांधी म्हणाल्या, "हे सर्व सध्या माझ्या मनात नाही. मी आयुष्यात कधीच काही मागितले नाही. जे काही मिळाले त्यात मी आनंदी आहे, असंही गांधी म्हणाल्या.
या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाने पुन्हा एकदा मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे.