लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:23 AM2023-05-28T11:23:16+5:302023-05-28T11:24:59+5:30

भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, तर काँग्रेस व विरोधी पक्षांकडे राहुल गांधी यांचा चेहरा आहे. 

Lok Sabha election congress Rahul Gandhi vs bjp narendra Modi who will be the Prime Minister People will decide | लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार 

लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार 

googlenewsNext

संजय शर्मा
नवी दिल्ली : २०२४ची सार्वत्रिक निवडणूक ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी विरुद्ध पंतप्रधाननरेंद्र मोदी’ अशी होईल व देशाची जनता दोन्हीपैकी एकाची निवड करील. मोदी सरकारमधील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व रणनीतीकारांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, २०२४ची लोकसभा निवडणूक चेहऱ्यावर होईल. भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, तर काँग्रेस व विरोधी पक्षांकडे राहुल गांधी यांचा चेहरा आहे. 

विरोधकांनी ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर या नेत्याने सांगितले की, भाजपला बहुतांश राज्यांत भाजपला काँग्रेसशीच मुकाबला करायचा आहे. ममता बॅनर्जी बंगालच्या बाहेर नाहीत. नितीशकुमार बिहारच्या आणि शरद पवार महाराष्ट्राबाहेर नाहीत. त्याचप्रमाणे केसीआरदेखील तेलंगणाच्या बाहेर नाहीत. 

...तर भाजपची अडचण
सपा, बसपा एकत्र आल्यास किंवा आम आदमी पार्टी, काँग्रेस यांच्यात समझोता झाल्यास भाजपला खरी अडचण आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. एवढे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. परंतु, त्यांच्याकडे चेहरा नाही. राहुल गांधी हेच चेहरा असतील.

पाच राज्यांतील निवडणुकींचा कितपत परिणाम? 

  • नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा २०२४ वर किती परिणाम होईल, असे विचारले असता या नेत्याने सांगितले की, २०१८ मध्येही भाजप मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगणामध्ये पराभूत झाला होता. 
  • परंतु, त्याचा परिणाम २०१९च्या लोकसभा निवडणुकीवर पडला नव्हता. यावेळीही असेच होईल. २०२३च्या नोव्हेंबरमध्ये भाजप सर्व राज्यांत पराभूत झाला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडणार नाही.

Web Title: Lok Sabha election congress Rahul Gandhi vs bjp narendra Modi who will be the Prime Minister People will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.