शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

लोकसभा निवडणूक : ‘राहुल गांधी विरुद्ध मोदी’, पंतप्रधानपदी दोघांपैकी कोण? जनता ठरविणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:23 AM

भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, तर काँग्रेस व विरोधी पक्षांकडे राहुल गांधी यांचा चेहरा आहे. 

संजय शर्मानवी दिल्ली : २०२४ची सार्वत्रिक निवडणूक ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी विरुद्ध पंतप्रधाननरेंद्र मोदी’ अशी होईल व देशाची जनता दोन्हीपैकी एकाची निवड करील. मोदी सरकारमधील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व रणनीतीकारांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, २०२४ची लोकसभा निवडणूक चेहऱ्यावर होईल. भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, तर काँग्रेस व विरोधी पक्षांकडे राहुल गांधी यांचा चेहरा आहे. 

विरोधकांनी ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर या नेत्याने सांगितले की, भाजपला बहुतांश राज्यांत भाजपला काँग्रेसशीच मुकाबला करायचा आहे. ममता बॅनर्जी बंगालच्या बाहेर नाहीत. नितीशकुमार बिहारच्या आणि शरद पवार महाराष्ट्राबाहेर नाहीत. त्याचप्रमाणे केसीआरदेखील तेलंगणाच्या बाहेर नाहीत. 

...तर भाजपची अडचणसपा, बसपा एकत्र आल्यास किंवा आम आदमी पार्टी, काँग्रेस यांच्यात समझोता झाल्यास भाजपला खरी अडचण आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. एवढे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. परंतु, त्यांच्याकडे चेहरा नाही. राहुल गांधी हेच चेहरा असतील.

पाच राज्यांतील निवडणुकींचा कितपत परिणाम? 

  • नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा २०२४ वर किती परिणाम होईल, असे विचारले असता या नेत्याने सांगितले की, २०१८ मध्येही भाजप मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगणामध्ये पराभूत झाला होता. 
  • परंतु, त्याचा परिणाम २०१९च्या लोकसभा निवडणुकीवर पडला नव्हता. यावेळीही असेच होईल. २०२३च्या नोव्हेंबरमध्ये भाजप सर्व राज्यांत पराभूत झाला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडणार नाही.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधान