Lok Sabha Election: एकीकडे सत्ताधारी भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये छोटे-मोठे वाद सुरुच आहेत. अशातच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसमधील या वादाची तुलना रिॲलिटी शो 'बिग बॉस'शी केली. तसेच, पुढील काही वर्षात डायनासोरप्रमाणे काँग्रेसदेखील नामशेष होणार असल्याचे म्हटले.
काँग्रेस 'बिग बॉस'सारखीउत्तराखंडमधील गौचर येथे एका सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, काँग्रेसमधून नेत्यांची पलायन सुरू आहे. काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही वर्षांत काँग्रेस डायनासोरप्रमाणे या पृथ्वीवरून नामशेष होण्याची भीती आहे. भविष्यात कुणी काँग्रेसचे नाव घेईल, तेव्हा मुले विचारतील काँग्रेस कोणता पक्ष आहे? काँग्रेसची अवस्था 'बिग बॉस'च्या घरासारखी झाली आहे. ते दररोज एकमेकांचे कपडे फाडत असतात.
मोदींमुळे युद्ध थांबले...युक्रेनमध्ये अडकलेल्या 22,500 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध चार तासांपेक्षा जास्त काळ स्थगित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती जग स्वीकारत आहे.
संरक्षण क्षेत्रात भारताची प्रगतीआता आपण आपली बहुतांश संरक्षण उपकरणे भारतात तयार करतो. पूर्वी देश फक्त 600 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करायचा. अवघ्या सात वर्षांत आम्ही 21000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उपकरणे निर्यात केली. भारत आता सामान्य देश राहिलेला नाही. काँग्रेस जनतेला खोटी आश्वासने देत आहेत. त्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी 50 टक्के आश्वासने पूर्ण केली असती, तर भारत एक विकसित देश झाला असता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.