चंदिगड - Narendra Modi on Congress ( Marathi News ) शीख समुदायासाठी भावनेचा मुद्दा असलेल्या करतारपूर कॉरिडोर भारतात नसल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटियाला येथील जाहीर सभेत खंत व्यक्त केली. जर १९७१ च्या युद्धात विजयी झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं योग्य बोलणी केली असती तर करतारपूर साहिब भारताचा हिस्सा असतं असं त्यांनी म्हटलं. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात ९० हजाराहून अधिक पाक सैन्यानं आत्मसमर्पण केलं होतं. जर त्यावेळी आम्ही सत्तेत असतो तर पाकिस्तानी सैन्याच्या सुटकेअगोदार करतारपूर साहिब भारतात घेतलं असतं असं मोदींनी म्हटलं आहे.
१९७१ च्या युद्धावेळी काय घडलं?
पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून १९७० च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानातील शरणार्थी भारतात येत होते. त्यावेळी बांग्लादेशाच्या मागणीसाठी आवामी लीगचे नेते शेख मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात मोर्चा उघडला होता. शरणार्थींची वाढती संख्या पाहता भारतानं त्यात हस्तक्षेप केला त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. डिसेंबर १९७१ मध्ये १३ दिवसांसाठी संघर्ष चालला. त्यात भारतीय लष्कराकडून ९३ हजार पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांवर सरेंडर करण्याची वेळ आणली.
१६ डिसेंबरला जनरल नियाजी यांनी आत्मसमर्पण पत्रकावर सही केली आणि नव्या बांग्लादेशाच्या निर्मितीसह पाकिस्तानी सैन्याची सुटका करण्यात आली. जवळपास ६ महिन्यानंतर जुलै १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पीएम जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करार झाला. विजयानंतर भारताने लाइन ऑफ कंट्रोलला सप्टेंबर १९७१ च्या स्थितीला मान्यता दिली. या करारात दोन्ही देश काश्मीरसह द्विपक्षीय प्रकरणी कुठल्याही मध्यस्थताशिवाय सोडवण्यावर सहमती बनली. तज्ज्ञांच्या मते, या करारात भारतानं अशी कुठलीही अट ठेवली नाही ज्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला असता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतारपूर साहिबचा उल्लेख करत एकाच दगडात २ निशाणे साधले आहेत. त्यात पहिले शीख मतदारांना आकर्षिक करणे आणि दुसरे काँग्रेसला या मुद्द्यावरून घेरणं.
दरम्यान, भाजपा पहिल्यांदाच पंजाबमध्ये १३ लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्याचं कारण पंजाबमधील बहुतांश जागांवर चौरंगी लढत होत आहे. १९९८ ते २०१८९ पर्यंत शिरोमणी अकाली दलसोबत भाजपा विधानसभा, लोकसभा लढत आली. आघाडीत भाजपाला ४ जागा मिळत होत्या. २००४ मध्ये भाजपाचे सर्वाधिक ४ खासदार होते. २००९ मध्ये केवळ १ जागा आणि १० टक्के मते मिळाली. २०२२ च्या विधानसभेत भाजपाला केवळ २ जागा आणि ६.६ टक्के मते पडली. हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर येत भाजपानं या निवडणुकीत अकाली दल, काँग्रेस आणि आपच्या शीख नेत्यांना पक्षात घेतले. ३ जागांवर महिला उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये विजयासाठी भाजपाला १० टक्क्यांहून अधिक मतांची गरज आहे.