Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी भाजप उमेदवार विनोद सोनकर यांच्या समर्थनार्थ कौशांबीमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान होण्याची कोणतीही शक्यता नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, राहुल गांधींचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीमध्ये पराभव झाला. यानंतर ते अमेठीतून फरार झाले. आता त्यांचा रायबरेलीमध्येही पराभवर होणार आहे. 'मुंगेरीलाल के हसी सपने'प्रमाणे तुमच्यापैकी कोणीही पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. राहुल गांधीदेखील हे स्वप्न पाहू शकतात, पण त्यांच्या पत्रिकेत पंतप्रधान होण्याचा योग नाही.
यूपीमध्ये 4 जूनला कमळ फुलणार आहेअखिलेश यादव यांच्यावर टीका करतना मौर्य म्हणतात, अखिलेश यादव स्वतः निवडणूक हरले आहेत. मतमोजणी होऊ द्या, 4 जून रोजी अखिलेश यांना कळेल. उत्तर प्रदेशात यूपीमध्ये काँग्रेस, सपा आणि बसपा आपले खाते उघडू शकणार नाही. इंडिया आघाडीने 10 किलो मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, 60 वर्षे सरकारमध्ये असताना त्यांनी गरीब, भुकेल्या आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केले. आता ते सरकारमध्ये नसल्याने जनतेची फसवणूक करत आहेत. काँग्रेस खोटं बोलण्याची मशीन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.