Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:58 AM2024-06-04T10:58:23+5:302024-06-04T11:07:54+5:30
Lok Sabha Election Result 2024 : ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती
Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३६० ते ४१५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारताच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकली तर आजपर्यंत असे फक्त एकदाच घडले आहे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाने लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे काँग्रेसने ५४१ पैकी ४१५ जिंकून विक्रम केला.
मतांचा विक्रम मोडेल?
१९८४ मध्ये विक्रमी मतांचाही रेकॉर्ड झाला होता. केवळ काँग्रेसलाच ४८.१२ टक्के मते मिळाली होती. १९८४ पासून कोणत्याही पक्षाला ४०० जागांचा टप्पा गाठता आलेला नाही किंवा ४०% पेक्षा जास्त मताधिक्यही मिळवता आलेले नाही. भाजपला २०१४ मध्ये ३१.३४% आणि २०१९ मध्ये ३७.७% मते मिळवता आली.