Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : देशभरात लोकसभेचे निकाल समोर आले आहेत. एनडीएने पुन्हा एकदा बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. तर दुसरीकडे, गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरातच्या २५ जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला आहे. यासह गुजरातमध्ये दशकभरानंतर काँग्रेसचे खाते उघडले आहे.
“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी
बनासकांठामध्ये काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन नागजी ठाकोर ३३४१३ मतांनी आघाडीवर असून त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. रेखाबेन यांचा पराभव केला आहे. याशिवाय पाटणच्या जागेवरही काँग्रेसने भाजपला कडवी टक्कर दिली. मात्र, आता भाजपचे उमेदवार २९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, गृहमंत्री अमित शहा यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ६ लाख ७५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. नवसारी जागेवर सीआर पाटील, पोरबंदर जागेवर मनसुख मांडविया, राजकोट जागेवर परशोत्तम रुपाला, अहमदाबाद पूर्व जागेवर हसमुखभाई पटेल, अहमदाबाद पश्चिम जागेवर दिनेशभाई मकवाना, अमरेली जागेवर भरतभाई सुतारिया आणि आनंद जागेवर मितेश पटेल हे भाजपचे इतर प्रमुख उमेदवार आहेत.
बनासकांठामध्ये काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन ठाकोर यांची आघाडी कायम राहिल्यास भाजपची यावेळी क्लीन स्वीपची हॅटट्रिक चुकणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या.
सुरत लोकसभा मतदारसंघातून २२ एप्रिल रोजी काँग्रेस उमेदवाराचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आणि इतर पक्ष आणि अपक्षांसह आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
याशिवाय राज्य विधानसभा पोटनिवडणुकीत पोरबंदर मतदारसंघातून भाजपचे अर्जुन डी मोधवाडिया विजयी झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी २०१९ मध्ये ६४.११ टक्के आणि २०१४ मध्ये ६३.९ टक्के होती. २०१९ आणि २०१४ मध्ये भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. त्यापूर्वी २००९ च्या निवडणुकीत भाजपला १४ तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या होत्या.