नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेतील अखेरच्या टप्प्याचे मतदान एक जूनला पार पडले आणि अवघ्या अर्ध्या तासात सर्व प्रमुख वाहिन्यांचे ‘एक्झिट पोल्स’ आले. या एक्झिट पोल्सचे वैशिष्ट्य असे की, या सर्व पोल्सनी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५०हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले. काही एक्झिट पोल्सनी रालोआ या आघाडीला ४०० हून अधिक जागा दिल्या.
मावळते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार चारशेपार’ असा नारा दिलेला होताच. तसेच प्रशांत किशोर यांच्यासारख्या राजकीय रणनीतीकारानेही भाजपला २०१९ च्या लोकसभेत मिळालेल्या जागांहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला. मावळते गृहमंत्री अमित शहा यांनीही साडेतीनशेहून अधिक जागा मिळतील, असा दावा केला.
त्या पार्श्वभूमीवर ‘एक्झिट पोल्स’चे आकडे जाहीर झाले. सर्व ‘एक्झिट पोल्स’ने एनडीएला दिलेल्या जागांची सरासरी होती ३६५, तर इंडिया आघाडीला मिळणा-या जागांची सरासरी होती १४६. पूर्णपणे एकतर्फी सामना असल्यासारखे चित्र एक्झिट पोल्सने रंगवले होते.
एक्झिट पाेल नेमके कशासाठी केले हाेते जाहीर?या एक्झिट पोल्सचा परिणाम म्हणून सोमवारी शेअर बाजाराने उसळी मारली. शेअर मार्केटने नवा विक्रम रचला; मात्र सर्वसामान्य जनतेचा एक्झिट पोल्सवर विश्वास नव्हता. विशेषतः महाराष्ट्रातील सर्व एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कल नोंदवला होता. प्रत्यक्षात ‘महाविकास’च्या बाजूने जनतेने कौल दिला.
एक्झिट पोल्स करताना पद्धतीशास्त्रीय चुका होत्या. संशोधनाची शिस्त नव्हती. जनतेशी संपर्क नव्हता. ‘सॅम्पल साइझ’ची पारदर्शकता नव्हती. मतदानाची जी आकडेवारी नंतर वाढली, त्याची नोंद नव्हती. अखेरच्या टप्प्याकडे लक्ष नव्हते. हे ‘एक्झिट पोल’ अशास्त्रीय होते आणि म्हणूनच ते ठार चुकीचे ठरले.
केवळ शेअर बाजारात उलाढाल व्हावी आणि टीआरपी मिळावा, यासाठी हे एक्झिट पोल्स जाहीर केले गेले होते का, असा सवाल आता विचारला जाता आहे. इथून पुढे ‘एक्झिट पोल्स’नी एक्झिट घ्यावी, असे हे प्रकरण आहे.
एक्झिट पोल्स किती टक्के ठरले खरे? संस्था एनडीए इंडिया इतर टक्के इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया ३६१-४०१ १३१-१६६ ८-२० ७०.५०% एबीपी-सीव्होटर ३५३-३८३ १५२-१८२ ४-१२ ७६.००% टीव्ही-९-पोलस्ट्रॅट ३४२ १६६ ३५ ७८.५०% इंडिया टीव्ही- सीएनएक्स ३७१-४०१ १०९-१३९ २८-३८ ६४.५०% एनडीटीव्ही- जन की बात ३६२-३९२ १४१-१६१ १०-२० ७१.००% इंडिया न्यूज डी-डायनामिक्स ३७१ १२५ ४७ ६६.५०% रिपब्लिक टीव्ही - पीएमएआरक्यू ३५९ १५४ ३० ७४.००% रिपब्लिक भारत - मॅट्रिझ ३५३-३६८ ११८-१३३ ४३-४८ ६७.५०% न्यूज-२४ टुडेज चाणक्य ४०० १०७ ३६ ६७.५०% पोल ऑफ पोल ३६५ १४६ ३२ ७१.५०% एआय एक्झिट पोल ३०५ ते ३१५ १८० ते १९५ ३८ ते ५२ ८७.५०% प्रत्यक्ष निकाल २९३ २३३ १७