Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 07:19 AM2024-06-07T07:19:26+5:302024-06-07T07:20:12+5:30
Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४४१ जागांवर, तर काँग्रेसने ३२८ जागांवर निवडणूक लढली.
नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेसची कामगिरी सुधारली. पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत पराभवामुळे काँग्रेसमुळे इंडिया आघाडीला केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून भाजपला रोखता आले नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४४१ जागांवर, तर काँग्रेसने ३२८ जागांवर निवडणूक लढली. त्यापैकी भाजपविरुद्ध काँग्रेस यांच्यात २२१ जागांवर थेट लढती झाल्या. त्यापैकी भाजपने १५८ जागांवर, तर काँग्रेसने ६३ जागांवर विजय मिळविला.
भाजपविरुद्ध काँग्रेस थेट लढती
मध्य प्रदेश भाजप २९ काँग्रेस ०, गुजरात भाजप २५ काँग्रेस १, कर्नाटक भाजप १७ काँग्रेस ९, उत्तर प्रदेश भाजप ११ काँग्रेस ६, छत्तीसगड भाजप १० काँग्रेस १, महाराष्ट्र भाजप ४ काँग्रेस ११, राजस्थान भाजप १४ काँग्रेस ८, हरयाणा भाजप ४ काँग्रेस ५, उत्तराखंड भाजप ५ काँग्रेस ०, दिल्ली भाजप ३ काँग्रेस ०, हिमाचल प्रदेश भाजप ४ काँग्रेस ०, बिहार भाजप ४ काँग्रेस १, आसाम भाजप ७ काँग्रेस २, झारखंड भाजप ५ काँग्रेस २, जम्मू-काश्मीर भाजप २ काँग्रेस ०, केरळ भाजप ० काँग्रेस १, मणिपूर भाजप ० काँग्रेस १, तेलंगण भाजप ८ काँग्रेस ६, चंडीगड भाजप ० काँग्रेस १, गोवा भाजप १ काँग्रेस १, दादरा नगर हवेली भाजप १ काँग्रेस ०, मेघालय भाजप ० काँग्रेस १, तामिळनाडू भाजप ० काँग्रेस २, त्रिपुरा भाजप १ काँग्रेस ०, पश्चिम बंगाल भाजप ० काँग्रेस १, अरुणाचल भाजप २ काँग्रेस ०, पंजाब भाजप ० काँग्रेस ३, अंदमान निकोबार भाजप १ काँग्रेस ०, एकूण २२१ जागा, भाजप विजयी १५८, काँग्रेस विजयी ६३