हिसार : नातेवाइकांमध्येच झालेल्या आणखी एका निवडणुकीची चर्चा रंगली हाेती. ही जागा हाेती हरयाणातील हिसारची. येथे चाैटाला कुटुंबीय एकमेकांविराेधात लढले. एवढे सगळे लढूनही एकाचाही विजय झाला नाही. येथे दाेन सुना आणि चुलत सासरे रिंगणात हाेते.
चाैटाल कुटुंबीयातील मतभेद बरेच चर्चेत हाेते. भाजपने रणजित चाैटाला यांना उमेदवारी दिली हाेती. त्यांच्याविराेधात जजपाच्या आमदार नयना चाैटाला आणि आयएनएलडी पक्षाच्या सुनयना चाैटाला निवडणुकीच्या रिंगणात हाेत्या. रणजित चाैटाला हे दाेघींचे चुलत सासरे लागतात. या लढतीत तिघांपैकी काेणाचाही विजय झाला नाही. काँग्रेसचे जय प्रकाश हे येथून विजयी झाले.
रणजीत चाैटाला यांना ५ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. तर नयना आणि सुनयना यांना प्रत्येकी जेमते २२ हजारांवर मते मिळाली. सुनयना यांचे पती पक्षाचे नेते अभयसिंह चाैटाला यांचाही कुरुक्षेत्र येथून पराभव झाला. येथे भाजपचे नवीन जिंदाल विजयी झाले. अभयसिंह यांना ७८,७०८ मते मिळाली.