इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 09:55 PM2024-06-05T21:55:41+5:302024-06-05T21:57:16+5:30

Lok Sabha Election Result 2024 : 'संविधानावर विश्वास असणाऱ्या सर्व पक्षांनी इंडिया आघाडीत सामील व्हावे.'- खर्गे

Lok Sabha Election Result 2024 : 'India will not try to form a coalition government', Mallikarjun Kharge ends the suspense after the meeting | इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती

इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती

Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण त्यांनी मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज एकीकडे राजधानी दिल्लीत NDA ची बैठक झाली, तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपल्या मित्रपक्षांसोबत भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया आघाडी सध्या सरकार स्थापनेचा दावा करणार नाही.

हा मोदींचा नैतक पराभव आहे
मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या म्हटले की, 'यंदाची निवडणूक भाजपने पंतप्रधान मोदींच्या नावावर आणि चेहऱ्यावर लढवली होती. पण, जनतेने मोदींच्या विरोधात कौल दिला. मतदारांनी त्यांना बहुमत दिले नाही, यातून हे स्पष्ट होते की, त्यांना भाजप नकोय. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय पराभवच नाही, तर नैतिक पराभवही आहे. पण त्याच्या सवयी जाणून आहोत. हे जनमत नाकारण्यासाठी ते शक्य तेवढा प्रयत्न करतील.' 

इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही
खर्गे पुढे म्हणतात, भाजपच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा जनादेश भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी, महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट शासनाविरुद्ध इंडिया ब्लॉक लढत राहील. आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू. जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करू, हा आमचा निर्णय आहे,' असे खर्गे म्हणाले. शिवाय, त्यांनी इतर पक्षांना इंडिया आघाडीत येण्याचे खुले निमंत्रणदेखील दिले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत हे नेते उपस्थित होते
या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, शरद पवार, सुप्रिया सुळे, एम.के. स्टॅलिन, टी.आर. बालू, अखिलेश यादव, रामगोपाल यादव, प्रियंका गांधी, अभिषेक बॅनर्जी, अरविंद सावंत एसएस (उबाठा), तेजस्वी यादव, संजय राउत, डी. राजा, चंपई सोरेन, संजय सिंह, राघव चड्ढा, दीपांकर भट्टाचार्य, उमर अब्दुल्ला आणि थिरु ई.आर. ईश्वरन यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते. 
 

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : 'India will not try to form a coalition government', Mallikarjun Kharge ends the suspense after the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.