शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

Lok Sabha Election Result 2024 : नितीशकुमार झाले अधिक ताकदवान, १२ जागा ताब्यात घेण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 12:38 PM

Lok Sabha Election Result 2024 : झारखंड आणि बिहारमधील जागा कमी झाल्याचा फटका एनडीएला बसला आहे.

- एस.पी. सिन्हानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील बिहार आणि झारखंडचे निकाल धक्कादायक ठरले आहेत. झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील कारवाई जनतेला पटलेली नसल्याचे दिसून आले. तर बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला असल्याने भाजपची कामगिरी चांगली झाली आहे. राज्यातील १६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या जदयूने १२ जागा ताब्यात घेण्यात यश मिळविले तर १७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. झारखंड आणि बिहारमधील जागा कमी झाल्याचा फटका एनडीएला बसला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. तर झारखंडमध्ये एनडीएला १४ पैकी १२ जागा मिळाल्या. बिहारमध्ये एनडीएला ६ जागांवर फटका बसला आहे. चिराग पासवान यांचा पक्ष आपल्या कोट्यातील पाचही जागांवर आपली मजबूत पकड दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान बिहारमध्ये २५१ सभा घेतल्या, मात्र आता त्यांची जादू चालली नसल्याचे दिसून येत आहे. आपला पक्ष आपल्या आई-वडिलांचा आहे, असे तेजस्वी यादव निवडणुकीच्या काळात सांगत राहिले. पण आता जनतेने पुन्हा एकदा नितीश आणि मोदींवर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते.

पक्षबदलूंना दणकाझारखंडमध्ये निवडणुकीपूर्वी पक्ष बदलून निवडणूक लढवणाऱ्या बहुसंख्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बिहारमधील जनतेने नितीशकुमार यांच्या नावावर मतदान केले.या निवडणुकीत मोठ्या आशा असलेल्या राजदला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.बिहार आणि झारखंडमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त लढत द्यावी लागली. बिहारबाबत सर्वच निवडणूक पंडितांचे भाकीत फोल ठरले. 

सर्व अंदाज चुकलेपलटी मारल्याने त्यांचा पक्ष कमकुवत होईल असे जे बोलत होते त्यांचे सर्व अंदाच चुकले आहेत. अशा स्थितीत अवघ्या काही महिन्यांपूर्वी एनडीएमध्ये दाखल झालेले नितीशकुमार हे राजकारणातील निष्णात खेळाडू आहेत, असे म्हटले जात आहे. स्वत:च्या पक्षाची कामगिरी सुधारण्याबरोबरच ते या निवडणुकीत भाजपसाठी संजीवनीही ठरत आहेत. निकालांवर नजर टाकली, तर पुन्हा एकदा नितीशकुमार अतिशय ताकदवान बनले आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४jharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल