मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:17 PM2024-06-04T14:17:20+5:302024-06-04T14:18:23+5:30
Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अतिशय जड गेली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.
Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी खुप जड गेली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अतिशय अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 290+ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी 230+ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपला एकट्याला बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. तसेच, भाजपच्या 6 मंत्र्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपापल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करवा लागू शकतो.
बिहार
आरा लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आरके सिंह 18213 मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुदामा प्रसाद 71784 मतांनी आघाडीवर आहेत.
उजियारपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नित्यानंद राय 2011 मतांनी पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आलोक कुमार मेहता 123926 मतांनी आघाडीवर आहेत.
बेगुसराय लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरिराज सिंह 38 मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार अबोध कुमार रॉय 197085 मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी 50758 मतांनी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेस उमेदवार किशोरी लाल 169827 मतांनी आघाडीवर आहेत.
लखीमपूर खिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अजय कुमार 3175 मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा 271638 मतांनी आघाडीवर आहेत.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जयवीर सिंह 92700 मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव 292330 मतांनी आघाडीवर आहेत.