शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा 
2
IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी
3
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
4
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
5
30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
6
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
7
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
8
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
9
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
10
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
11
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
12
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
13
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
14
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
15
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
16
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
17
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
18
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
19
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
20
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 2:17 PM

Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अतिशय जड गेली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.

Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी खुप जड गेली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अतिशय अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 290+ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी 230+ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपला एकट्याला बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. तसेच, भाजपच्या 6 मंत्र्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपापल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करवा लागू शकतो. 

बिहारआरा लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आरके सिंह 18213 मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुदामा प्रसाद 71784 मतांनी आघाडीवर आहेत.

उजियारपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नित्यानंद राय 2011 मतांनी पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आलोक कुमार मेहता 123926 मतांनी आघाडीवर आहेत.

बेगुसराय लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरिराज सिंह 38 मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार अबोध कुमार रॉय 197085 मतांनी आघाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशउत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी 50758 मतांनी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेस उमेदवार किशोरी लाल 169827 मतांनी आघाडीवर आहेत.

लखीमपूर खिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अजय कुमार 3175 मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा 271638 मतांनी आघाडीवर आहेत.

मैनपुरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जयवीर सिंह 92700 मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव 292330 मतांनी आघाडीवर आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश